चिंचखेड ग्रामपंचायत सरपंचपदी राधाबाई सताळे...

चिंचखेड ग्रामपंचायत सरपंचपदी राधाबाई सताळे...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आवर्तन पद्धतीने सौ.राधाबाई वामनराव सताळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

शुक्रवार दि.३ रोजी ग्रामपंचायत हॉलमध्ये झालेल्या या निवडणूक प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी   महसूल मंडळ अधिकारी समाधान केंग ग्रामविकास अधिकारी नानासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली.यावेळी कादवा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक त्रंबकराव संधान संचालक  दादासाहेब पाटील ग्रामपंचायत उपसरपंच संगीता मातेरे ग्रामपंचायत सदस्या सुरेखा संधान ज्योती दत्तात्रय संधान मीनाक्षी गुंबाडे कुसुम पवार अनिल पगारे माणिक पवार रमेश गुंबाडे किसन धुळे ग्रामपंचायत कर्मचारी योगेश फुगट सविता पुरकर रावसाहेब सताळे जीवा सताळे सोमनाथ सताळे तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.