चिंचखेडला उद्या इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन...

चिंचखेडला उद्या इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी वरुथिनी एकादशीच्या दिवशी ओम चैतन्य गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त ओम चैतन्य कानिफनाथ महाराज महाराज यात्रोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती कानिफनाथ मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ झेंडफळे यांनी दिली आहे.

शनिवार दि. ४ रोजी सकाळी ९ ते ११ वा. कानिफनाथ पालखीची मिरवणूक त्यानंतर पाद्य पूजा होम हवन व महाआरती,तसेच रात्री ८ ते १० निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ते११ नंदू महाराज पवार यांचे काल्याचे किर्तन होणार असून दुपारी महाप्रसाद व रात्री ८ ते १० वा. शाहीर किसन पीठे चापडगावकर यांचे नवनाथ भक्ती पर गायन होणार असून भाविकांनी या यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन कानिफनाथ मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.