पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू...

पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू...

प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ

पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे नेमणुकीस असलेले तथा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई कुणाल अशोक रुडे (वय 42) बक्कल नंबर 743 यांचा दि. ५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असल्याने ते सर्व परीचीत होते.

हृदयविकाराच्या झटक्याने दुख:द निधन झाल्याने; पोलीस दलात सध्या दुःखाची लाट पसरली आहे. मृतक कुणाल यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी / मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वा. उमरखेडे येथील हिंदू स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यासह उमरखेड शहरातील मित्र मंडळ अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.