सातपूरला आढळला अतिशय दुर्मिळ फ्रॉस्टन मांजऱ्या साप...

सातपूरला आढळला अतिशय दुर्मिळ फ्रॉस्टन मांजऱ्या साप...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

घनदाट जंगल व डोंगराळा भागात आढळणारा फ्रॉस्टन मांजऱ्या जातीचा साप नाशिक शहरातील सातपूर परिसरात लोकवस्ती मध्ये आढळून आल्याने नाशिक जिल्ह्यातील जैविविधता आणखी अधोरेखित झाले आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की दि.२७ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास समृद्ध नगर सातपूर येथील रहिवासी राजेश गायकवाड यांनी त्यांच्या सोसायटी आवारात साप शिरल्याचे पाहिले असता त्यांनी तत्काळ प्राणीमित्र आदित्य केदारे यांना फोन करून बोलावले केदारे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.साप बघितल्यानंतर हा साप दुर्मिळ समजला जाणारा फ्रॉस्टन मांजऱ्या जातीचा अर्धविषारी साप असल्याचं लक्षात आले.यावेळी जी.पी.एस लोकेशन दाखवणारा फोटो कॅमेरात कैद करत सापाला कुठलीही इजा न होऊ देता साधारणतः चार फुटाचा साप सुरक्षित रित्या पकडला. तेथील उपस्थित नागरिकांना साप सापाचे प्रकार व विषाचे प्रकार यावर शास्त्रीय माहिती देत जनजागृती देखील केली. 

वनविभागाचे सातपूर विभागातील कर्मचारी सचिन आहेर यांना साप पकडल्याचे नोंद करत माहिती दिली. त्यानंतर सापाला सुरक्षित रित्या निसर्गात मुक्त केले .या सापाची माहिती केदारे यांनी प्राणीमित्र विक्रम कडाळे आणि जयेश पाटील यांना सांगितली तेव्हा या जातीचा सापाची शहरात पहिली तर जिल्ह्यात तिसरी नोंद असल्याचे त्यांनी सांगितले. या पूर्वी मागील तीन महिन्यांमध्ये प्राणीमित्र प्रल्हाद पवार यांना हरसूल येथे दोन साप निदर्शनास आले होते.

प्रतिक्रिया...

मुळात सहसा डोंगराळ भागात वृक्षांच्या फांद्यांवर आपले जीवन जगणारा निमविषारी असा हा साप मनुष्यासाठी हानिकारक नाही. नाशिक शहर तसेच संपूर्ण जिल्हा हा जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहे आणि शहरालगत दुर्मिळ वन्यजीवांचे दर्शन होणे हे जैवविविधतेची परिपक्वता दर्शवते. परंतु वाढती वृक्षतोड आणि काँक्रीटीकरण यामुळे या जैवविविधतेवर परिणामी आपल्यावर मोठ संकट येणार हे निश्चित. डोंगराळ भागात वास्तव्यास असणारा हा दुर्मिळ सर्प शहरी भागात येण्यास अनेक कारण आहे जसे तेथे होणारे खणीकर्म,वाढते प्रदूषण,अन्नाची कमतरता इत्यादी.

अदित्य केदारे.प्राणीमित्र,(नाशिक)