दिंडोरी तालुका भाजपाच्या सांस्कृतिक सेलच्या सरचिटणीसपदी दत्तात्रय जाधव

दिंडोरी तालुका भाजपाच्या सांस्कृतिक सेलच्या सरचिटणीसपदी दत्तात्रय जाधव

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील रहिवासी तथा आ.म.सुतार लोहार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय जाधव यांची नुकतीच भाजपाच्या दिंडोरी सांस्कृतिक सेलच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

दिंडोरी येथील गेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत भाजपा जम्मू कार्यकारणी पार पडली त्यामध्ये जिल्हा सरचिटणीस मनीषा बोडके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे,शाम बोडके,सांस्कृतिक सेल तालुकाध्यक्ष रमेश शिरसागर आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाधव त्यांच्या या निवडीचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.