चाकणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत मोठा प्रवेश...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
चाकण : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने, तसेच शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख श्री भगवानजी पोखरकर यांच्या नेतृत्वात आज चाकणमध्ये शिवसेनेला मोठी ताकद प्राप्त झाली आहे.
चाकण नगरपरिषद प्रभाग क्र. ११ मधील सर्वसाधारण पुरुष मतदारसंघातून श्री योगेश रमेशशेठ देशमुख, तसेच ओबीसी महिला मतदारसंघातून सौ. स्मिता शशिकांत जाधव यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या माजी नगरसेविका सौ. वृषालीताई योगेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला नवचैतन्य दिले.
या प्रवेश सोहळ्यात जिल्हाप्रमुख श्री भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख श्री प्रकाश वाडेकर, तसेच शहरातील मान्यवर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी नव्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
शिवसेनेच्या या शक्तिप्रदर्शनामुळे चाकण नगरपरिषदेत पक्षाची ताकद आणखी बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.