खेड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग; खाराबवाडीत जाहीर सभा...

खेड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग; खाराबवाडीत जाहीर सभा...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण 

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील उमेदवारांबाबत नागरिकांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा थेट जाणून घेण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवार दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता खाराबवाडी येथे ही जाहीर सभा संपन्न होणार आहे.

या जाहीर सभेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. सचिनजी आहेर (उपनेते/संपर्क प्रमुख/मंत्री/आमदार) तसेच मा. श्री. बाबाजी रामचंद्र काले (आमदार, खेड–आळंदी विधानसभा) हे उपस्थित राहणार आहेत.

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील उमेदवारांच्या नागरिकांसाठी असलेल्या वैयक्तिक समस्या, शासकीय अडचणी तसेच आरोग्यविषयक प्रश्न याबाबत प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली असून, यामाध्यमातून पुढील वाटचालीसाठी नागरिकांचे आशीर्वाद घेण्यात येणार आहेत.

या सभेमध्ये महाळुंगे पंचायत समिती गणातील दीपाली अमित बवले, नाणेकरवाडी–महाळुंगे जिल्हा परिषद गटातील जीवन मोहन खरातवाडी तसेच नाणेकरवाडी पंचायत समिती गणातील रुपाली दीपक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या जाहीर सभेचे आयोजन श्री. जीवनभाऊ मोहन खरातवाडी, सरपंच – खाराबवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.