देश जवाब चाहता है म्हणत.! काँग्रेस अध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना 10 प्रश्न...

देश जवाब चाहता है म्हणत.!  काँग्रेस अध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना 10 प्रश्न...

NEWS15 रिपोर्ट - मुंबई

लोकसभा आणि राज्यसभेच सध्या अधिवेशन चालू असून, या अधिवेशनात भारतीय उद्योजक गौतम अदाणी आणि पंतप्रधान मोदी यांचं नाव मोठ चर्चिलं जात आहे. हिंडेनबर्ग या संशोधन संस्थेने एक अहवाल सादर करून, देशाचं राजकारण ढवळून टाकलं आहे. तर विरोधकांनी या मुद्दा जोरात लावून धरला असून, सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

तसेच लोकसभा आणि राज्यसभेनंतर आता विरोधक सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करू लागले असून, राष्ट्रीय कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना 10 प्रश्न विचारले आहेत.

काय आहे ट्विट.! ( मल्लिकार्जुन खरगे यांच्या ट्विट्टरद्वारे, मराठी अनुवाद...)

https://twitter.com/kharge/status/1623982182288195584?s=20&t=yC2Z2k6_2pCyfpuh3MqRfg

देशाला उत्तर हवी आहेत.! 

1. अदानी घोटाळ्याची चौकशी व्हायला नको का?

2. अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवलेल्या एलआयसीच्या पैशाच्या घसरलेल्या किमतींवर प्रश्न विचारायला नको का?

3. SBI आणि इतर बँकांनी अदानीला दिलेल्या ₹82,000 Cr च्या कर्जाबद्दल प्रश्न विचारले जाऊ नयेत?

4. अदानीच्या शेअर्समध्ये ३२ टक्क्यांहून अधिक घसरण होऊनही एलआयसी आणि एसबीआयचे ५२५ कोटी अदानी एफपीओमध्ये का गुंतवले गेले, हे विचारायला नको का?

5. एलआयसी आणि एसबीआयच्या शेअर्सची किंमत शेअर बाजारात १ लाख कोटींहून अधिक का घसरली, हे विचारायला नको का?

6. टॅक्स हेव्हन्समधून अदानीच्या कंपन्यांकडे येणारे हजारो कोटी रुपये कोणाचे आहेत, हे विचारायला नको का?

7. अदानींचे एजंट म्हणून मोदीजींना श्रीलंका आणि बांगलादेशात कंत्राटे मिळाली होती का? पंतप्रधानांनी अदानींना इतर कोणत्या देशात मदत केली?

8. तपास पूर्ण होईपर्यंत फ्रान्सच्या “टोटल गॅस” ने अदानीच्या कंपनीतील US $ 50 बिलियनची गुंतवणूक थांबवली आहे हे खरे आहे का?

9. मोदीजी आणि संपूर्ण सरकार अदानी एक शब्दही संसदेत बोलू देत नाही, याचे कारण काय?

10. काय कारण आहे की, RBI, SEBI, ED, SFIO, कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री, इन्कम टॅक्स, सीबीआय हे सगळे अदानीच्या तपासाच्या नावाखाली डोळे झाकून बसले आहेत?

इत्यादि प्रमुख 10 प्रश्न कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना तथा सरकारला केले आहेत. आता यावर सरकारकडून काय प्रतिक्रिया येते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. तर या प्रश्नावरून राजकारणात काय नवीन मोड येतो हे पाहणे महत्वाचे आहे.