दिंडोरी लोकसभा मतदार संघाची बैठक संपन्न...!
![दिंडोरी लोकसभा मतदार संघाची बैठक संपन्न...!](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_657087327c146.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरी तालुका शिवसेना पक्ष संघटन आढावा घेण्यासाठी दोन दिवसाच्या जिल्हा दौर्यावर आलेले शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मंगळवारी नाशिक लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक घेत पदाधिकाऱ्यांना सुचना करत आढावा घेतला. तसेच बुधवारी दि.६ रोजी दिंडोरी लोकसभा मतदार संघाची बैठक नाशिक विश्रामगृहावर झाली.
यावेळी सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे समवेत संपर्कप्रमुख सुनीलभाऊ पाटील माजी आ.धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे उपस्थित होते. यावेळी संपर्कप्रमुख सुनील पाटील यांनी सदस्य नोंदणी तसेच रखडलेल्या नियुक्त्या त्वरीत करुन करणे, शिवसेना पक्षाच्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशीं सहमत असलेल्यांना प्रथम प्राधान्य देवुन त्यांना शिवसेनेत एकरुप करुन घ्यावे अशी सूचना केली.
संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी यांनी संपुर्ण लोकसभेचा आढावा घेत असता संपर्कप्रमुख तसेच जिल्हाप्रमुख यांना सक्त सुचना केल्या काम करणाऱ्यांना प्राधान्य द्या ज्यांचे काम थांबले त्त्यांच्या जागी नव्या नियुक्त्या करा.पुढील येत्या १० दिवसाच सर्व नियुक्त्या व सदस्य नोंदणी झाल्या पाहीजे अशा सुचना केल्या व यावेळी पेठ येथील पदमाकर कामडीसह कार्यकर्त्यांनी तसेच उबाठा गटाच्या वणीच्या गटप्रमुख उज्वला पवार यांनी संपर्कनेते भाऊ चौधरी यांचे प्रमुख उपस्थित शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी माजी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे, उपजिल्हाप्रमुख देवा वाघ, शांताराम ठाकरे, दिंडोरी तालुकाप्रमुख अमोल कदम,पेठ घनश्याम महाले,सुरगाणा हरीभाऊ भोये,चांदवड विकास भुजाडे,महीला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलाताई भास्कर,रोशनीताई निचीत,श्रध्दाताई कुलकर्णी तसेच दिंडोरी लोकसभा मतदार संघातील विधानसभेचे उपतालुकाप्रमुख,शहरप्रमुख, गटप्रमुख,गणप्रमुख,युवासेना पदाधिकारी, लोकप्रतीनीधी उपस्थित होते.