उमरखेड विधानसभेत 42 पैकी 25 जणांचे अर्ज मागे.! 17 उमेदवार रिंगणात...
प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड
उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढतीत किसन वानखेडे व काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांच्यात होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 42 पैकी 25 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून.! आता 17 उमेदवार फायनल रिंगणामध्ये उभे आहेत.
त्यामध्ये 1) भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन वानखेडे, २) राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे साहेबराव कांबळे, ३) मनसेचे उमेदवार राजेंद्र नजरधने, ४)बसपाचे सुभाष रणवीर, ५) वंचित बहुजन आघाडीचे तातेराव हनवते, ६) आझाद समाज पार्टीचे देवानंद पाईकराव, ७) राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रज्ञेश पाटील, ८) बळीराजा पार्टीचे बाळासाहेब रास्ते, या पक्षीय पार्टी समवेत नऊ जण अपक्ष उभे असूनम त्यामध्ये १) काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विजय खडसे २) भाजपाचे बंडखोर उमेदवार भाविक भगत ३) आघाडीतील उबाठाचे मोहन मोरे यासह आत्माराम खडसे, अंकुश रंजकवाड, विद्वान केवटे, नथू लांडगे, मंजुषा तिरपुडे, राहुल शिरसाट असे एकूण 17 उमेदवार रिंगणात उभे असून, नामांकन मागे घेण्याच्या दिवशी काँग्रेस आणि भाजप तर्फे अपक्ष उमेदवारांचे नामांकन वापस घेण्यासाठी धावपळ सुरू होती.