खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांची दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील स्थिर पथकांना भेटी

खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांची दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील स्थिर पथकांना भेटी

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

विधानसभा सार्वत्रिक निवडणूका २०२४ अंतर्गत दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघातील स्थिर पथकांना  खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांनी भेटी देऊन पाहणी करत अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या. 

याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रीया पार पाडत असतांना कोणतेही अनुचित प्रकार अथवा बेकायदेशीर घटना घडू नये यासाठी महाराष्ट्र व गुजरात हद्दीवरील पिठुंदी , गोळशी फाटा व वणी येथे सुरू करण्यात आलेल्या स्थिर पथकांना निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षक श्रीमती गायत्री यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून मुदतीत कार्यवाही करणेबाबत  सुचना दिल्या. तसेच शासकीय वाहने,बसेस व मालवाहतुक करणा-या गाडयांची तपासणी करणे बाबत निर्देश दिले. दारू, रोख रक्कम विविध भेट वस्तू यांचे वितरणावर बारीक लक्ष ठेवणे बाबत सांगितले आहे.