अहमदपुर युवासेना नुतन पदाधिकारी नियुक्ती...

अहमदपुर युवासेना नुतन पदाधिकारी नियुक्ती...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

युवासेना पदाधिकारी यांची शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे युवासेना पदाधिकारी आढावा बैठक व नियुक्ती असा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप भैय्या सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाप्रमुख किरण स्वामी, शिवसेना विधानसभाप्रमुख सुनील देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख अहमदपूर गोपीनाथ जायभाये, शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण भाऊ आलगुले, तालुकाप्रमुख चाकुर खंडू भाऊ वाघ, उपजिल्हाप्रमुख कृष्णा सरवदे, महिला तालुकाप्रमुख सुवर्णाताई रोकडे आदी मान्यवर उपस्थित होती,

या मध्ये युवा सेना पदाधिकारी आढावा बैठक अहमदपूर येथे या कार्यक्रमात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुनील देशमुख यांनी केले त्याचबरोबर युवासेना जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात अहमदपूर चाकूर विधानसभेत महायुतीमध्ये शिवसेना पक्षाला मोलाचा वाटा व विजयाचा शिलेदार म्हणून सहभागी केली जाईल, त्याचबरोबर सामान्य शिवसैनिकापासून पदाधिकाऱ्यापर्यंत योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आपले मत व्यक्त केले

त्यानंतर उपजिल्हाप्रमुख किरण भाऊ स्वामी तालुकाप्रमुख गोपीनाथ जायभाये महिला तालुकाप्रमुख सुवर्णाताई रोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, शहर प्रमुख लक्षण भाऊ अलगुले यांच्या कार्याची कौतुक केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरज पाटील यांनी केले, या मध्ये युवासेना नुतन पदाधिकारी खालील प्रमाणे निवडी करण्यात आल्या

युवासेना  अहमदपुर -चाकुर  विधानसभा प्रमुख रोहन जाधव,

 युवासेना अहमदपुर -चाकुर विधानसभा समन्वय परमेश्वर पाटील, 

युवासेना तालुकाप्रमुख संगम पाटील,

युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील,

सौरभ कुलकर्णी युवासेना तालुका सरचिटणीस

नागेश वरवटे युवासेना उपतालुका प्रमुख

अभिषेक भुसारे युवासेना तालुका संघटक

सोनु कच्छवे युवासेना विधानसभा सरचिटणीस

शहाजी कदम युवासेना तालुका समन्वयक 

या प्रसंगी शिवसेना युवासेना शिवसैनिक आदी उपस्थित होते...