मोठी बातमी : खेड तालुक्यातील तुतारीतील नेत्याच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेश अडचणीचा ठरणार? युवासेना पदाधिकारी राजीनाम्याच्या पवित्र्यात..?
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खेड तालुक्यातील महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक बडा नेता लवकर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. पण हाचं प्रवेश शिंदे शिवसेनेची डोकेदुखी ठरू शकतो.
खेड तालुक्यातील एक मोठा नेता शिंदे शिवसेनेत येत्या चार ते पाच दिवसात तुतारी सोडून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा तालुकाभर रंगली आहे. त्यातच या नेत्याच्या प्रवेशाचे सर्व सोपस्कार पूर्णही झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्राकडून मिळाली आहे. पण याची कोणतीही कल्पना शिंदे शिवसेनेच्या युवा पदाधिकारी यांना न दिल्याने तालुक्यातील सगळे युवा शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही नेत्याला आमच्या पक्षात घेताना आमचीही भूमिका समजावून घेणे महत्वाचे होते पण आम्हाला कुठेही विश्वासात न घेता थेट बड्या नेत्याचा प्रवेश ठरवल्याने आम्ही सर्व सामुदायिक राजीनामे नेतृत्वाकडे सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे खेड तालुक्यातील बड्या नेत्याचा शिंदे शिवसेनेतील प्रवेश अडचणीचा ठरू शकतो असे राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत. यावर आता पक्ष नेतृत्व कोणती भूमिका घेणार? आणि नाराज युवा शिवसेनेच्या पदाधिकारी यांची कशी समजूत काढणार हेच पहावें लागेल.