राजकीय : चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीचे प्रभाग क्रमांक सात मधील इच्छुक उमेदवार यांच्याकडून दिपावली फराळ वाटप..!

राजकीय : चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीचे प्रभाग क्रमांक सात मधील इच्छुक उमेदवार यांच्याकडून दिपावली फराळ वाटप..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : चाकण नगरपरिषद निवडणुकीतील इच्छुक उमेदवार यांच्याकडून प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार सागर बनकर व अँड वर्षा शेवकरी यांच्याकडून प्रभागातील नागरिकांना दीपावली फराळ वाटप करण्यात आले. 

गुरुवार(दि.२३)रोजी प्रभागातील श्री.नागेश्वर महाराज,श्री.भैरवनाथ महाराज श्री.जय मल्हार महाराज यांचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण प्रभागात आकर्षक घड्याळ,मिठाई पॉकेट तसेच शुभेच्छा पत्रक घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.

सध्याची चाकणची राजकीय परिस्थिती बघता सागर बनकर आणि महिला प्रतिनिधी अँड वर्षा शेवकरी यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार म्हणून बघितले जाते. त्यांनी प्रभागातील नागरिकां प्रती कायम कटीबद्ध राहण्याची ग्वाही इच्छुक उमेदवार यांनी दिली आहे. चाकण नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार यांनी मतदारांच्यापर्यत पोहचण्यास आघाडी घेतली आहे. त्यामुळे येत्या चाकणपरिषद निवडणुकीत जो उमेदवार मतदारांपर्यंत पोहचतील तेच उमेदवार हे नगरपरिषद निवडणुकीत विजयी होतील असा कयास राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत. सध्या तरी वरील इच्छुक उमेदवार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आपली उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. अजून निवडणुकीला बराच कालावधी असल्याने नक्की कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून निवडणूकिला सामोरे जाईल हेच पहावे लागले.