दिंडोरी लोकसभेसाठी ॲड. गोरक्षनाथ चौधरी यांच्या उमेदवारीची मागणी...
![दिंडोरी लोकसभेसाठी ॲड. गोरक्षनाथ चौधरी यांच्या उमेदवारीची मागणी...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65e330f73444f.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
भारतीय जनता पक्ष नेहमीच लोकसभा व विधानसभा मतदारसंघाकरिता नवनवीन चेहऱ्यांना संधी देतो. पक्षासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाजप कायमच विचार करतो. या अनुषंगाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी अनेक इच्छुक आहेत. यात सगळेच उमेदवार आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेने पक्षाकडे बघत आहेत. अशातच दिंडोरी, पेठ सुरगाणा, कळवण, निफाड, चांदवड, देवळा, नांदगाव आणि येवला या परिसरातून ॲड.गोरक्षनाथ चौधरी यांचे नाव चर्चेत येत आहे.
चौधरी यांनी त्यांचे कार्य जनजाती क्षेत्रात आरोग्य,शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच कायदेविषयक सल्ला व साधुसंतांची सेवा यासाठी केले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार त्यांच्यावर असल्याने एक शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. व्यवसायाने वकील असल्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी व्हावा यासाठी ते तत्पर असतात.गेल्या २५ वर्षापासून समाजसेवेचे हे व्रत त्यांनी हाती घेतलेले आहे.या निष्ठावान कार्यकर्त्यास लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास त्याचा फायदा निश्चित होईल असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो.चौधरी यांच्या उमेदवारीसाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी केंद्रातील व राज्यातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा भाजपा कार्यकर्ते करीत आहेत.