सामाजिक कार्यकर्ते जाधव यांचा सोसायटीच्यावतीने सत्कार...
![सामाजिक कार्यकर्ते जाधव यांचा सोसायटीच्यावतीने सत्कार...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65e330124ad33.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने नुकताच सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
जाधव यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले असून गरीब जनतेसी नाळ जोडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना कसा देता येईल यासाठी नेहमी ते प्रयत्नशील असतात आरोग्य, पाणी प्रश्न, शैक्षणिक, रस्त्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न यासाठी नेहमी कार्यरत असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सोसायटीच्या व ग्रामपंचायतच्यावतीने चेअरमन ज्ञानेश्वर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, मोहन गांगुर्डे व संचालक मंडळाने दखल घेऊन जाधव यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मुख्याध्यापक बोराडे व बापू चव्हाण यांनी जाधव यांच्या कार्यविषयी आपल्या मनोगतातून माहिती दिली.
याप्रसंगी सोसायटीचे व्हा.चेअरमन बबन पवार छबु मटाले, गणपत गायकवाड, मुख्याध्यापक एम.व्ही.बोराडे, संदीप गायकवाड, अरुण गायकवाड, शेख सचिव गायकवाड, संजय गुरुळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले तर आभार बोराडे यांनी मानले.