रोहित पवार ED कार्यालयात.! ईडी;कडून पवारांची आज चौकशी.! पहा काय आहे कारण?

रोहित पवार ED कार्यालयात.! ईडी;कडून पवारांची आज चौकशी.! पहा काय आहे कारण?

NEWS15 मराठी - मुंबई

महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. काही आठवड्यांपूर्वीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कंपनी कार्यालयावर छापा टाकला असता; आज रोहित पवार यांना (२४ जानेवारी) चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.

यावेळी रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्यामध्ये जे ६४ कारखाने चौकशीच्या फेऱ्यात आहेत, त्यात माझ्याबरोबरच अजित पवार यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीय आणि आधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पण आता भाजप किंवा फुटीर गटात असलेल्या नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. माझी केस अत्यंत साधी सोपी असून त्याविषयीची उत्तरे याआधीही मी दिली आहेत. आता पुन्हा चौकशीतही सहज देईन’, असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला.

पवार यांना ईडी'ने चौकशीसाठी बोलावले असता; यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्या म्हणाल्या की, 'सत्यमेव जयते, आमच्यासाठी संघर्षाचा काळ'...संघर्ष करु, मात्र सत्याच्याच मार्गाने चालू... 'आव्हानांना आम्ही सत्याच्या मार्गाने सामोरे जाणार '...'केंद्रीय संस्थांचे 90 ते 95 % खटले विरोधकांविरोधात.

तर मला आतापर्यंत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जी कागदपत्रे मागितली ती दिली आणि यापुढेही मी चौकशीला सहकार्य करत राहीन. ईडीची विरोधकांवर कारवाई सुरू झाली म्हणजे निवडणूक जवळ आली हे समजते. त्यामुळे डगमगून न जाता ही लढाई मी सुरू ठेवेन आणि ईडीला सामोरा जाईन’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) रोहित पवार यांनी मंगळवारी दिली. कार्यकर्त्यांनी संयम बाळगून कुठलाही अनुचित प्रकार करू नये, अशी विनंतीही पवार यांनी केली आहे.