वलखेड येथे अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाची बैठक संपन्न...

वलखेड येथे अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाची बैठक संपन्न...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे आज शनिवार दि.21 ऑक्टोंबर रोजी  अखिल महाराष्ट्र सुतार लोहार दिंडोरी तालुका संघटनेचे मारुती मंदिराच्या सभागृहात संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. प्रथमता भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या बैठकीमध्ये पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य योजनेची माहिती समाज बांधवांना देण्यातआली. दिंडोरी तालुक्यातील नियोजित विश्वकर्मा मंदिर, महिला सक्षमीकरण, बांधकाम कामगार योजना, तालुक्यातील समाज बांधवांची जनगणना आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपसरपंच लहानु पाटील यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. याशिवाय काही वर्षांपूर्वी समाज बांधवांच्यावतीने अवजारांसाठी दीडशे रुपये फि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आली होती त्याबाबतही चर्चा करण्यात आली. संघटनेचे पदाधिकारी संदीप आहेर यांनी विश्वकर्मा पीएम योजने संदर्भात माहिती दिली. शरद शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. तर बापू चव्हाण यांनी आभार मानले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष रमेश क्षिरसागर, तालुकाध्यक्ष शरद शिरसाट, उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप, आनंदा राजगुरू, नारायण राजगुरू, भूसंपादन समितीचे अध्यक्ष मधुकर भागवत, त्रंबक जगताप, संजय मोरे, दत्तात्रय जाधव, धीरज पेंढारी, सोमनाथ जगताप, अशोक राजगुरू, राजेंद्र बोराडे, प्रदीप जाधव, प्रकाश काळे, सुनील खैरनार, राहुल क्षिरसागर, संजय जगताप, राजेंद्र जगताप आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.