दिंडोरी येथे आज महाविकास आघाडीची बैठक...

दिंडोरी येथे आज महाविकास आघाडीची बैठक...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथे आज सोमवार दिनांक २६ रोजी सायंकाळी ५ वाजता येथील पोपटराव जाधव संकुल सोसायटी सभागृहात दिंडोरी लोकसभा महा विकास आघाडी च्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भास्कर भाकरे यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते श्रीराम सिटी राज्य उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड नाशिक शहर अध्यक्ष गजानन शेलार नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष व दिंडोरी लोकसभा प्रभारी दत्तात्रय पाटील

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाराम पानगव्हाणे शरद आहेर जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे नाशिक शहराध्यक्ष आकाश छाजेड ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते सुनील भाऊ बागुल जिल्हा संपर्कप्रमुख उदयजी हिरे नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, गणेश धात्रक नितीन आहेर यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आली आहे.