हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी नारळ फोडून केले प्रचाराचे उद्घाटन
प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री नागेश पाटील अष्टीकर यांनी उमरखेड तालुक्यातील अमृतेश्वर महादेव मंदिर हरदडा येथे आपल्या प्रचाराचे नारळ फोडून केली सुरुवात.
यावेळी महाविकास आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागेश पाटील अष्टीकर यांनी सांगितले की मला प्रतिस्पर्धीच नाही त्यामुळे मी मोठ्या मताने निवडून येईल व विकासाचे अनेक कामे आणिल अशी आश्वासन दिले. यावेळी काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती राम देवसरकर, तातू पाटील देशमुख, प्रकाश पाटील देवसरकर, हदगाव शिवसेनेचे कार्यकर्ते प्रभाकर पत्तेवार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.