अजितदादा यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे - खा. सुनील तटकरे
![अजितदादा यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे - खा. सुनील तटकरे](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_66a79393d47a7.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
राज्यातील जनतेसाठी महायुती सरकारने एक लाख हजार कोटी रुपयांच्या योजना राबविल्या असुन शेतकर्यांच्या कृषी पंपाचे विज बिल सरसकट माफ करण्याचा निर्णय घेऊन शेतकर्यांना दिलासा दिला आहे. राज्यातील सर्वच घटकांसाठी महायुतीचे सरकार काम करत आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केले.
दिंडोरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे आयोजित जनसन्मान यात्रेत खा.तटकरे बोलत होते.व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले की, अजितदादा पवार यांनी सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार असुन मुलींना मोफत शिक्षण मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद अशा कितीतरी योजना राबविल्या जात आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून झिरवाळ हेच महायुतीचे उमेदवार राहतील असे शेवटी खा.तटकरे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की मतदार संघाच्या हितासाठी आपण सदैव अजित पवारांसोबत असुन मतदार संघात रस्ते,विज पाणी शिक्षण आदी प्रश्न सोडविण्यावर आपला भर असुन अजित पवारांनी कोट्यवधी रुपयांचा निधी विविध विकास कामांना मतदारसंघासाठी दिला आहे. यापुढेही मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहु,असे आश्वासन आ. झिरवाळ यांनी दिले.
याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष चेतन कासव,ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, विश्वासराव देशमुख, तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे,कैलास मवाळ,गोपीनाथ पाटील,अशोकराव टोंगारे,कृष्णा मातेरे,नामदेवराव हलकंदर,संगीता राऊत,लताबाई बोरस्ते,विलास कड,एकनाथ गायकवाड, कचरु पाटील, नरेंद्र पेलमहाले, जगदिश जाधव, विलास काळे,अविनाश जाधव, रावसाहेब संधान, बापूराव पडोळ,तुषार वाघ, त्र्यंबक निखाडे,शहाजी सोमवंशी, नीलेश पेलमहाले,संपत कड,राहुल कावळे,भास्कर आहेर,संदीप गोतरणे, संतोष डोमे,गिरीष गावित,परिक्षित देशमुख,बबन जाधव,अजित कड, रामभाऊ घडवजे,विष्णू पाटील, सत्यजित राजे, दिपक जाधव, डॉ. विजय गटकळ,राहुल गायकवाड, बापू तासकर,प्रतिक पाटील,दुर्गेश चित्तोडे, मधुकर भरसट,मनोज शर्मा,आर.के. खांदवे, मंगेश पवार, नितीन भालेराव, अमोल पवार,पिनु मौले, िंहरामण गावित,सलीम मिर्झा,जहीर शेख, सफिराज तांबोळी,सोमनाथ बस्ते, आरिफ शेख,जुलील शेख,मोसीन शेख,इरफान शेख,जमीर शेख, दिलावर तांबोळी, सचिन कावळे, ऋषीकेश देशमुख,आस्करी मिर्झा, अल्ताफ शेख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी केले.सुत्रसंचालन डॉ. योगेश गोसावी यांनी केले तर आभार युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे यांनी मानले.