राजकीय : एकीकडे जिल्हा परिषद निवडणुकांची अनिश्चितता तर दुसरीकडे उमेदवारांची विविध पक्षांकडे तिकीटासाठी वणवण..!

राजकीय : एकीकडे जिल्हा परिषद निवडणुकांची अनिश्चितता तर दुसरीकडे उमेदवारांची विविध पक्षांकडे तिकीटासाठी वणवण..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबत इच्छुक उमेदवाराना न्यायालयीन प्रक्रियांची अडचण त्याच बरोबर ऐनवेळी तिकीट बदलाच्या शक्यतेने अक्षरशः खेड तालुक्यातील बऱ्याच इच्छुक उमेदवारांना तिकिटासाठी विविध पक्षांकडे वनवन करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

खेड तालुक्यात जिल्हा परिषद उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. कोण देवदर्शनाच्या ट्रीप काढत आहे तर कुणी विविध महिला भगिनीच्यासाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम भरवत आहेत. तर काही उमेदवार यांनी वृद्ध व्यक्तीसाठी डोळे तपासणी शिबिरे सुरु केली आहेत. पण नक्की कुणाला कोणत्या पक्षाचे तिकीट भेटणार आणि कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार यावर मात्र अजूनही तालुक्यात उलट सुलट चर्चा रंगताना दिसत आहेत.

काही जिल्हा परिषद गटात दोन,तीन ते चार पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यातील कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यायचे यावरून काही पक्षाच्या श्रेष्ठीपुढे पेच निर्माण झाला आहे. तर काही उमेदवार सगळ्या पक्षाचा नेत्यांना भेटून आम्हाला उमेदवारी दया असाही आग्रह धरत आहेत. पण स्वपक्षातच जास्तीचे उमेदवार इच्छुक असताना आता आयात उमेदवार यांना पक्षाचे नेते कशी संधी देणार आणि दिलीच तर मूळ पक्षातील इच्छुक यांची नाराजी श्रेष्टी कशी थोपवणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

खेड तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे एक,दोन जागा सोडता सगळ्याच गटात्तील उमेदवार ठरले असल्याचे चित्र दिसून येते. पण त्या तुलनेत उबाठा पक्षाचे खेड तालुक्यात आमदार असताना त्यांच्या पक्षाच्या बऱ्याच गटातील तिकिटांच्या बद्दल अजूनही संभ्रम दिसून येत आहे. आत्ताच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत आमदार बाबाजी काळे यांच्या निर्णय प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या तीनही नगरपरिषद निवडणुकीत अस्थित्व उरते कि नाही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. २०२४ च्या निवडणुकीत आमदार बाबाजी काळे यांनी आपल्या राजकीय भविष्यासाठी जे निर्णय घेतले त्या निर्णयाची त्यांना या नगरपरिषद निवडणुकीत मोठी किमत मोजावी लागत आहे. त्यांनी पुढे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सर्वपक्षीय युती किंवा स्वपक्षाची राजकीय भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करायला हवी. नाहीतर बघू करू अशा भूमिकेत जर आमदार राहिले तर याही निवडणुकीत त्यांना याची किमत मोजावी लागेल यात कोणतीही शंका नाही.

आमदार बाबाजी काळे यांनी आपल्याला २०२४ च्या निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यानी आपले पक्ष बाजूला ठेऊन काम केले अशा आणि ज्या पक्षांनी फक्त बाबाजी काळे म्हणून २०२४ ला मदत केली अशा इच्छुक उमेदवार यांच्या बाबत तातडीने निर्णय घेऊन आपली राजकीय चाणाक्ष नीती अवलंबून निर्णय घ्यायला हवा. नाहीतर काही कार्यकर्त्यांनी २०२४ ला आमदार यांच्या विरोधात काम केले आणि त्यांनी कोणती तरी स्कीम दिली म्हणून त्यांना तिकीट दिले तर त्याचा मोठा फटका आमदार बाबाजी काळे यांना बसू शकतो.विशेष सांगायचे म्हणजे आमदार यांनी कोणत्याही सर्व पक्षांची दारे झिजवून आलेल्या इच्छुक उमेदवार यांना त्यांच्या पक्षाचे तिकीट द्यायला नको. खेड तालुक्यात सर्व पक्षीय आघाडी झाली तरच त्यांच्या गटाचे जास्तीचे उमेदवार निवडणून येऊ शकतात जर सगळे पक्ष वेगळे लढले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला होईल. त्यामुळे तालुक्याचे प्रमुख म्हणून बाबाजी काळे यांनी सर्व राजकीय परिस्थितींचा अभ्यास करून आता वेळ न घालवता योग्य असा निर्णय घ्यायला हवा नाहीतर गाडी गेल्यावर वर हात करून उपयोग होणार नाही.

खेड तालुक्यातील काही इच्छुक उमेदवार तर आम्हाला सर्वच पक्षांचे तिकीट मिळणार आहे असा गाजावाजा करत आहेत. तर काही उमेदवार आपली प्रामाणिक तयारी करताना दिसत आहेत. त्यामुळे काही दिखावा करणारे आणि आम्हाला फक्त निवडणूक लढायची मग तो पक्ष कोणताही असो अशी भूमिका घेणारे उमेदवार यांना या निवडणुकीत राजकीय अस्ताकडे जाण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. आता फक्त आमदार यांची समयसूचकता आणि योग्य निर्णय याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावर आता पुढील काही दिवसात कोणत्या राजकीय घडामोडी होतात हेच पहावे लागेल.