अहमदनगर जिल्हा बँक संचालक सिताराम पाटील गायकर यांची चौकशी लावून "अगस्ती कारखाना" अडचणीत आणण्याचे विरोधकाकडून व्यक्तीद्वेशी षडयंत्र…?
![अहमदनगर जिल्हा बँक संचालक सिताराम पाटील गायकर यांची चौकशी लावून "अगस्ती कारखाना" अडचणीत आणण्याचे विरोधकाकडून व्यक्तीद्वेशी षडयंत्र…?](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_6338064a997f0.jpg)
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले : अगस्ती साखर कारखाण्याची मतदान प्रक्रिया एक दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यातच विरोधकांकडून कोणत्या न कोणत्या मार्गाने अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक सिताराम पाटील गायकर यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच ज्यांना इथून मागे गायकर पाटील यांच्याकडुन गपचूप मलिदा खायला गोड लागत होता त्यांच्याच कार्यकर्ते यांच्याकडुन आता सिताराम पाटील गायकर यांची अहमदनगर जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार करून त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावरून जो पर्यंत आपल्या बरोबर काम करत आहेत तो पर्यंत सगळे माफ एकदा तुमच्या पासून बाजूला झाले की, फक्त व्यक्तीद्वेषाने कोणत्या न कोणत्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचे असा सुभाच विरोधकांकडून अवलंबला जात आहे. यावरून सिताराम पाटील गायकर यांना टार्गेट करायचे आणि ते जे कारखाना चालविण्यासाठी हट्टाहास करत आहेत त्याला कुठे तरी अडथळा निर्माण करून संस्था कशी अडचणीत येईल या दृष्टीने विरोधक प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
अहमदनगर जिल्हा बँक निवडणूकीच्या वेळी हेच विरोधक गायकर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गाड्या भरून गेले होते. पण विरोधी नेत्याचा स्वतःचा अर्ज मानहानी जनक पद्धतीने माघार घ्यावा लागला आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते अमित भांगरे यांची वर्णी लागली हाच आकस मनात धरून आणि पुढे कारखाना निवडणुकीत सिताराम पाटील गायकर यांनी ऐनवेळी निवडणूकीला स्थगिती मिळुनही कारखाना सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला आणि कारखाना सुरु करण्यासाठी तब्बल ६८ कोटी रुपये जिल्हा बँकेकडून मिळवले. हाच मनात आकस ठेवून आता कुठे तरी आपले अस्थित्व खालसा होते की काय? म्हणून विरोधकांनी एकत्र येऊन हे सिताराम पाटील गायकर यांच्या अहमदनगर जिल्हा बँक संचालक पद बेकायदेशीर असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करून व्यक्तीद्वेष तालुक्यातील जनतेला दाखवून दिला आहे.
सिताराम पाटील गायकर पात्र, अपात्र ठरतील या न्याय व्यवस्थेचा विषय आहे. पण, ऐन कारखाना निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेच्या तोंडावर ठरवून केलेले विरोधकांचे षडयंत्र तालुक्यातील सुज्ञ जनता हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही हे तितकेच खरे म्हणावे लागेल.
या सर्व विरोधकांच्या क्लूत्यावरून एकच लक्षात येते की, त्यांना सिताराम पाटील गायकर यांना टार्गेट करून कुठे तरी "अगस्ती" अडचणीत आणून आपला 3 डाव साधायचा आहे हे स्पष्ट दिसून येते. यावर सुज्ञ नागरिक नक्कीच योग्य निर्णय घेतील.