परिवहन भारत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश एलिंजे...

परिवहन भारत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश एलिंजे...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश एलिंजे यांची महाराष्ट्र  राज्य परिवहन भारत  संघटना नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. योगेश एलिंजे यांना परिवहन संघटना भारत बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी योगेश एलिंजे यांनी सांगितले की, परिवहन भारत संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्यावतीने चालक मालक यांना वेळोवेळी उद्भवणार्‍या समस्यांवर तोडगा व मदतकार्य करुन संघटना वाढविण्यात येईल असे सांगितले. योगेश एलिंजे यांच्या निवडीचे दिंडोरी नगरपंचायतीचे स्विकृत नगरसेवक अ‍ॅड. संतोष जाधव, नगरसेवक नितीन गांगुर्डे, संदीप गांगुर्डे, उमेश आंबेकर, मनोज मवाळ, विकी खरे, वैभव गायकवाड, यादवराव बोरस्ते, सचिन जाधव, धनंजय बोरस्ते, राजेंद्र खिरकाडे, मुकेश केदार, विठ्ठल पिंगळ, कैलास गवारी, प्रतिक आंबेकर, यश आंबेकर, राजेंद्र जाधव, दवंगे सर, उमेश जगताप, दिलीप पवार, मनोज उदार, मनोज राऊत, अंकुश पवार आदींनी अभिनंदन केले आहे.