दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची.! ४ वा. ओम साई लॉन्स येथे महत्त्वाची बैठक...
![दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची.! ४ वा. ओम साई लॉन्स येथे महत्त्वाची बैठक...](https://news15marathi.com/uploads/images/202303/image_750x_6423bff194962.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज बुधवार (दि.२९) दुपारी ४ वा. परमोरी (ता. दिंडोरी) ओम साई लॉन्स येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती; राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर भगरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शाम हिरे यांनी दिली.
यावेळी बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असून, बैठकीचे अध्यक्षस्थानी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे हे राहणार आहेत.
बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, गणपत पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, बाळासाहेब जाधव, विश्वासराव देशमुख, प्रकाश वडजे, शहाजी सोमवंशी, तालुका महिला अध्यक्ष संगीता राऊत आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, बाजार समिती संचालक, जि. प. सदस्य / पं. स. सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हा चेअरमन / संचालक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी केले आहे.