पुसद विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडी शरद पवार गटाचे शरद मैंद यांचे पारडे जड?
![पुसद विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडी शरद पवार गटाचे शरद मैंद यांचे पारडे जड?](https://news15marathi.com/uploads/images/202411/image_750x_67347f74521bb.jpg)
प्रतिनिधी - किरण मुक्कावार, पुसद (यवतमाळ)
पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे शरद मैंद; यांचे पारडे जड असल्याची सध्या चर्चा होत आहे.
1952 पासून पुसद विधानसभेवर नाईक घराण्याचे राजकीय वर्चस्व आहे. पण आज पर्यंत पुसद शहराचा कायापालटच झाला नाही असं जनतेतून बोलले जात आहे. तर दुसरीकडे मात्र; महाविकास आघाडी शरद पवार गटाचे उमेदवार शरद भाऊ मैंद यांनी पुसद विधानसभा मतदारसंघ आपलासा करून घेतल्याचं सांगितले जातंय.
तसेच दरवेळेस एकच एक चेहरा असल्यामुळे, पुसदवासी कंटाळले असून.! एक कुशल नेतृत्व आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे; ते म्हणजे शरद मैद हे पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणून मागील कित्येक दिवसापासून त्यांचे उत्कृष्ट काम असल्यामुळे तसेच सामाजिक कामात त्यांचे अतिशय मोठे योगदान असल्याने; आज शरद मैद यांचे पारडे जड असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.