जयंत पाटील आमच्या सोबत येण्यासाठी वेटिंगमध्ये? मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा मोठा गौप्यस्फोट...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - आकाश वालदे, गोंदिया
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीप यांनी जयंत पाटील अजित पवारांसोबत येणार होते मात्र ते एका घटनेमुळे थांबले असे वक्तव्य केले. यावर राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना गोंदियामध्ये विचारले असता; त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील हे आमच्या सोबत येण्यासाठी वेटिंग मध्ये आहेत. अजित पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, त्यांच्यासोबत 45 आमदार आहेत. येत्या काळात 53 आमदार होतील हे नक्की; असाही दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात आमचं सरकार क्रांतिकारक निर्णय घेणार : धर्मरावबाबा आत्राम
तसेच संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून, मराठा बांधव आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मराठा आरक्षणा संदर्भात विचारले असता; मराठा समाज बांधवांनी आक्रमक होऊ नये हे चुकीचे आहे. आमच सरकार मराठ्यांच्या पाठीशी असून मराठ्यांसाठी क्रांतीकारक निर्णय घेणार असेही आत्राम म्हणाले