आमदार सत्यजित तांबे आज दिंडोरी दौऱ्यावर...
![आमदार सत्यजित तांबे आज दिंडोरी दौऱ्यावर...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_652786bc45ab1.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
विधान परिषद नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे आज गुरुवार दि. १२ रोजी; दिंडोरी तालुका दौऱ्यावर येत असून दिंडोरी, वणी, खेडगाव, कादवा कारखाना अशा अनेक ठिकाणी ते भेटी देऊन मतदारांचे आभार मानणार आहेत.
आमदार झाल्यानंतर सत्यजित तांबे यांचा हा पहिलाच दिंडोरी दौरा असून, विधान परिषदेतील एक युवा व अभ्यासु आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार सत्यजित तांबे प्रयत्नशील असून, दिंडोरी दौऱ्यात ते शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, वकील पत्रकार तसेच युवा शेतकर्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेणार आहेत.