राज्यपालांविरोधात आज पुणे बंद.! हा बंद बेकायदा असून, छत्रपती उदयनराजेंना तात्काळ अटक करा - अँड. गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
![राज्यपालांविरोधात आज पुणे बंद.! हा बंद बेकायदा असून, छत्रपती उदयनराजेंना तात्काळ अटक करा - अँड. गुणरत्न सदावर्ते यांची मागणी](https://news15marathi.com/uploads/images/202212/image_750x_63983407a86d6.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : आशिष ढगे पाटील
पुणे : स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भगतसिंग कोश्यारी यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याने, मागील काही दिवसांपासून राज्यात शिवप्रेमी आणि काही सामाजिक व राजकीय पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर स्वत: छत्रपती घराण्याचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या विरोधात असून, त्यांनी नुकतेच काही दिवसापूर्वी रायगड येथे आक्रमक पवित्र घेतला होता.
याच पार्श्वभूमीवर आज भाजप आणि मनसे सोडून इतर सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, व्यावसायिक नागरिक आणि शिवप्रेमी एकत्र आले असतं; त्यांनी आज पुणे बंदची हाक दिली.! तर या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून, शहरात अनेक प्रमुख ठिकाणं आणि मार्ग सुनसान दिसत आहेत. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. झाली. यात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले देखील सहभागी झाले आहेत.
परंतु, यासर्व घटनेवर अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देत.! हा बंदच बेकायदा असल्याचे म्हणटले आहे. पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली आहे.
तर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचा हा कडवट पवित्रा आणि वकील सदावर्ते यांची ही प्रतक्रिया आल्याने, पुन्हा: नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.