आळंदी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका पत्रकार संघांचे निवेदन, तर तालुका समन्वय पदी कल्पेश भोई यांची निवड....!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
आळंदी : पुणे जिल्हाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाई फेक प्रकरणी पोलिसांचे निलंबन थांबवणे तसेच कोणतीही चूक नसताना News18 लोकमतचे प्रतिनिधी यांना अटक केल्या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.

पुणे जिल्हाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषाच्या बद्दल केलेल्या संतापजनक वक्तव्याचा निषेध म्हनून एका व्यक्तीने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा सहभाग नसतानाही फक्त पत्रकार म्हणून झालेल्या घटनेचा व्हिडिओ पुढे पाठवल्या प्रकरणी News18 लोकमतचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेवेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवाना कोणतीही चूक नसताना त्यांनाही निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राभर उमटले आहेत.
याच घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार संघाच्या बैठकीमध्ये पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावर झालेल्या अटक कारवाईचा निषेध घेण्यात आला. तसेच त्याबाबत ज्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे ती त्वरित मागे घेण्यात यावी त्यांची या प्रकरणात पोलिसांचे निलंबन झालेले आहे ते लवकरात लवकर मागे घेण्यात यावे अशी निवेदनातून मागणी करण्यात आली.
आळंदी शहरात खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संघ वाढीसाठी सर्वानुमते प्रयत्न करणार असल्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. यावेळी खेड तालुका पत्रकार संघाच्या समन्वय पदी जेष्ठ पत्रकार कल्पेश भोई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सम्राट राऊत, कल्पेश भोई, आशिष ढगे पाटील, सचिव अँड. प्रितम शिंदे, खेड तालुका पत्रकार संघाचे सहसचिव आरिफ भाई शेख,सुनील बटवाल, मनोहर गोरगल्ले, अनिकेत गोरे, लहू लांडे, नितीन सैद, विलास दाभाडे, बापूसाहेब सोनावणे, चंद्रकांत भालेराव, अर्चना हजारे, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय घुले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आळंदीचे आरिफ शेख यांनी केले होते.तर आभार दत्तात्रय घुले यांनी मानले.