शिवनई येथील हरिनाम सप्ताहाची विविध धार्मिक कार्यक्रमांनी जोरदार सांगता...

शिवनई येथील हरिनाम सप्ताहाची विविध धार्मिक कार्यक्रमांनी जोरदार सांगता...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील शिवनई  येथे नुकतीच अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनाने करण्यात आली. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव देऊ येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले बाबांचा अमृत महोत्सवानिमित्त याचे आयोजन करण्यात आले होते.

सप्ताह काळामध्ये पहाटे काकडा भजन, श्री निवृत्तीनाथ महाराज गाथा व पारायण हरिपाठ आदींसह दोन सत्रात प्रवचने व नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झाली. याशिवाय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह सांगता वेळी पांडुरंग महाराज घुले बाबांची सजवलेल्या रथातून समपत्नी टाळ मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात गावभर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी बाबांचे पूजन करून सप्तधान्यांनी बाबांची तुला करण्यात आली. यावेळी पांडुरंग गडकरी व मनीषा गडकरी यांनी पूजन करून औक्षण केले. या सप्ताह काळामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे तसेच अनेक मान्यवरांनी भेट देऊन पांडुरंग महाराज घुले यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी हजारो भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.