साक्री येथे अणुव्रत उदबोधन सप्ताह उत्साहात साजरा...

साक्री येथे अणुव्रत उदबोधन सप्ताह  उत्साहात साजरा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - खंडेराव पवार, धुळे

तेरापंथ भवन साक्री येथे जैन धर्मियांचे अणुव्रत विश्व भारती सोसायटी च्या तत्त्ववधान अणुव्रत उदबोधन सप्ताह. दिनांक 1 ऑक्टोबर  ते 7 ऑक्टोबर 2023 या सात दिवसांत कार्यक्रम मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाला. साक्री  येथे चातुर्मासासाठी आलेले राष्ट्रसंत आचार्य  महाश्रमणजींच्या विद्वान सुशिष्या साध्वीश्रीजी  पावन प्रभाजी, साध्वीश्रीजी आत्मायशाची. साध्वीश्रीजी उन्नतयशाची,  साध्वीश्रीजी रम्यप्रभाजी यांच्या मार्गदर्शनाने या सामाजिक व प्रेरणादायी अणुव्रत उदबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते . त्यासाठी अणुष्रत सोसायटीची निर्मिती करण्यात आली .या सोसायटी द्वारा सात दिवस दररोज वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे तज्ञ वक्त्यांचे  मार्गदर्शन हि करण्यात आले होते. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी 1  ऑक्टोबर 2023 रोजी  तेरापंथ भवन  साक्री येथे साध्वीश्रीजी  पावन प्रभाजी यांनी अणुव्रत उदबोधन सप्ताहचे मंगलाचरणने उदघाटन केले.  व  त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली व निरोगी निरामय जीवनाबद्दल मार्गदर्शन केले.

 2 ऑक्टोबर 2023 या दुसऱ्या दिवशी साध्वीश्रीजी पावन प्रभाजी यांनी अहिंसा दिवस या विषयावर खूपच अनमोल मार्गदर्शन केले .3 ऑक्टोबर 2023 या तिसरा  दिवसी  विषय -  अणूव्रत प्रेरणा दिवस,ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे तालुका अध्यक्ष प्राचार्य  बी. एम. भामरे  तसेच साक्री तालुका प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरेश पारख यांनी  जीवनात लहान लहान नियम व  संकल्प करून व्यसनमुक्त, सुखी जीवनाचे रहस्य या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन करून मनोगत व्यक्त केले .4 ऑक्टोबर 2023 चौथा दिवस पर्यावरण  शुद्धी दिवस,मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख,निसर्ग मित्र  समितीचे प्रमुख प्रा. पी.झेड. कुवर सर यांनी पर्यावरण या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. 5 ऑक्टोबर 2023 पाचवा  दिवस  विषय नशामुक्ती  दिवस  न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ  महाविद्यालय साक्री  येथे प्राचार्य श्री संजय बच्छाव सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि600 विद्यार्थ्यांना साध्वीश्रीजी पावन प्रभाजी, साध्वीश्रीजी  आत्मयशाजी, साध्वीश्रीजी उन्नतयशाजी, साध्वीश्रीजी रम्यप्रभाजी यांनी व्यसनमुक्त या विषयावर छान मार्गदर्शन केले.. तसेच  अणूव्रत नियमां बद्दल आणि  आई - वडील आणि  आपल्या शिक्षकांचे  सदैव  आदर  करावे आदी विषयावर मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला. समितीच्या कार्याची माहिती समिती  अध्यक्ष सौ  जोशीला  पगारिया यांनी दिली. प्राचार्य संजय बच्छाव यांनी आभार व्यक्त केले .6 ऑक्टोबर 2023 सहवा दिवस आदर्श माध्यमिक विद्यालय साक्री येथे विद्यार्थ्यांना साध्वीश्रीजी पावनप्रभाजी व त्यांच्या सोबत असलेल्या साध्वीश्रीजी उन्नतयशाजी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याचा, चोरी न करण्याचा, कॉपी न करण्याचा, प्रामाणिक राहण्याचा ,खरे बोलणे, आई वडील गुरुजी आणि मोठ्यांचा  आदर  व सन्मान करण्याचा, अनुशासनप्रिय राहण्याचा या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. कान खिचो -  बुद्धी बढाओ  या सारखे  छोटे  छोटे  प्रयोग करून  दाखविले. प्राचार्य डी एन. पाटील यांनी साध्वीश्रीजी चे  स्वागत शब्दसुमनाने केले. आणि  सुंदर  असे कार्यक्रम आयोजित  केल्या बद्दल  छान  मार्गदर्शन केल्याबद्दल साध्वीश्रीजी सहित समिती अध्यक्षा  सौ  जोशीला  पगारिया व   तेरापंथ  समाजाचे चे आभार व्यक्त केले.