आठ वर्षीय आमेरा निख्खत खय्युम शेख ने धरला पवित्र रोजा...

आठ वर्षीय आमेरा निख्खत खय्युम शेख ने धरला पवित्र रोजा...

NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख

लातूर : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरु आहे. पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून, किनगाव येतील मदरसा गुलशने उम्मे कुलसुम रजी लिलबनात येथील कु.आमेरा निख्खत खय्युम शेख (वय वर्षें ८ ) तसेच जगाचा निर्माता अल्लाहप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

सध्याचे तापमान पाहता रखरखत्या उन्हात पहाटे पाच वाजेपासून सायंकाळी ६:४२ वाजेपर्यंत अन्नाचा एक ही कण आणि पाण्याचा एक ही घोट न घेता दिवसभर उपाशी पोटी राहून, त्यांनी अल्लाहप्रती आपली श्रद्धा व्यक्त केल्या. विशेष  म्हणजे शेख कु. आमेरा निख्खत खय्युम शेख (वय वर्षें ८ ) व रोजा (उपवास) करून आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आजी आजोबा व परिवारातील सदस्य यांनी त्यांना पुढील उज्ज्वल भविष्य व चांगल्या आरोग्य करिता अल्लाह कडे प्रार्थना केली. त्यांचे समाजाच्या विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.