पालखेड बंधारा विद्यालयात; राखी बनवणे कार्यशाळा संपन्न...
![पालखेड बंधारा विद्यालयात; राखी बनवणे कार्यशाळा संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64eb14a960ac2.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात; उपशिक्षिका तारकेश्र्वरी देशमुख यांनी.! विद्यार्थ्यांना काही दिवसांवर येऊ घातलेल्या तसेच बहिण भावाच्या पवित्र अतूट नात्याच्या असणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त व राखी कशी तयार करावी या बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सूचनेचे पालन करून, विद्यार्थ्यांनी राख्या बनविल्या व शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक यांना सप्रेम भेट दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी विद्यालयाला भेट दिली असता विद्यार्थ्यांची हस्तकला पाहून आनंद व्यक्त करून कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक एम.व्ही.बोराडे उपशिक्षक संजय वाघ,कैलास गुरुळे एस.एस.गांगुर्डे कर्मचारी उपस्थित होते.