ग्रामविकासासाठी पंचसुत्री संकल्पना प्रभावी : मा. आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील

NEWS15 प्रतिनिधी : सुधाकर सूर्यवंशी (शिरूर अनंतपाळ)
लातूर - ग्रामविकासाठी पंचसूत्री संकल्पना प्रभावी माध्यम असून, गाव पातळीवरील लोकप्रतीनिधी, सरपंच व गावकऱ्यांनी एकमेकांना समजून घेतल्यास गावचा सर्वांगीण विकास होण्यास काहीही अडसर ठरणार नाही असे प्रतिपादन; आदर्श गाव पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी शिरुर अनंतपाळ येथे.! अनंतपाळ बहुउद्देशीय विकास सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजीत कार्यक्रमाध्ये केले.
शिरुर अनंतपाळ शहरातील बसवेश्वर चौकामध्ये श्री. अनंतपाळ बहुउद्देशीय विकास सेवाभावी संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय, केंद्रीय आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त पाटोदा ग्रामपंचायतचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे ग्रामविकासावर प्रबोधनपर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतपाळ नुतन विद्यालयाचे सचीव प्रभाकरराव कुलकर्णी गुरुजी, नगरविकास उपायुक्त लातुर रामदास कोकरे, शिरुर अनंतपाळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, लातुर जि. प. माजी उपाध्यक्ष अँड. संभाजीराव पाटील, अँड जयश्रीताई पाटील, नगराध्यक्षा मायावती धुमाळे, गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रविण राठोड आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले की, देशाच्या रक्षणामध्ये ज्याप्रकारे सीमेवरील जवानांचे महत्व आहे. त्याअर्थी ग्रामविकासामध्ये गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी, गावच्या प्रगतीमध्ये महिलांचे खुप मोठे योगदान असते; कारण महिला ही चौकस व व्यवहार्य असते.! विकासाच्या प्रक्रीयेत महिला आघाडीवर असून, तीच्याद्वारे गामविकासाचे काम गतीने होते असेही यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले.