संजय येशी यांना राष्ट्रीय स्तरावरील तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार प्रदान...

प्रतिनिधी - बापू चव्हाण नाशिक
संजय सोमनाथ येशी पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद शाळा फांगुळगव्हाण ता.इगतपुरी,जि.नाशिक यांनी पदवीधर शिक्षक म्हणून आपल्या सेवेत आजपर्यंत तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभाविपणे राबविल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना नरोतम सखसेरिया फाउंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले आहे.
सदर पुरस्कार मुंबई प्रेस क्लब, मुंबई येथील सभागृहात राजीव निवतेकर (IAS),आयुक्त,वैद्यकीय शिक्षण व संशोधन,महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ.विवेक पाखमोडे, सहसंचालक,रिटा परवडे,सहाय्यक संचालक,आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तसेच नंदिना रामचंद्रन,मुख्य कार्यकारी अधिकारी,सलाम मुंबई फाउंडेशन,मा.मनीष जोशी,नरोतम सखसेरिया फाउंडेशन आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्यातील ६ व उत्तर प्रदेश राज्यातील १ अशा एकूण ७ पुरस्कारार्थीना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व रु.२५ हजार रकमेचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
संजय येशी यांनी पदवीधर शिक्षक म्हणून सेवा करत असताना नाशिक जिल्ह्यातील नाशिक व इगतपुरी या तालुक्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.