नवरात्री उत्सवाला दांडीया ठरला आनंदाची पर्वणी...

नवरात्री उत्सवाला दांडीया ठरला आनंदाची पर्वणी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड

सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तसेच सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण होत आहे. उमरखेड शहरातील  नाथ नगर येथील साई मंदिराच्या प्रांगणात जय मातादी दुर्गासव मंडळाच्यावतीने; दांडिया स्पर्धेचे आयोजन उत्साहात पार पडले.

यामध्ये चिमुकल्या पासून ते मोठ्यापर्यंत मुली - मुलं, महिला, युवती यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. नवरात्र उत्सवामध्ये चिमुकल्या शाळकरी मुलींचा दांडीया व गरबा खेळताना उत्साह ओसंडून वाहत होता. यामध्ये खासकर करून सौ. निधीताई भुतडा, सौ. भावनाताई उदावंत, सौ. सुजाता वानखेडे, सौ. निकिता उदावंत, सौ. ससाने ताई, सौ. लताबाई वैद्य, सौ. सव्वाशे काकु, अनिकेत ताजवे, मयूर उदावंत, युवराज पाटील, सौ. देवसरकर पाटील ताई, सौ. पदमावार ताई, हरीश अग्रवाल, रवी वैद्य, किरण मुकावार यांनी सहभाग घेतला.