पाटेकुर्रा (झुरकुटोला) येथे चक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंती थाटात साजरी...
![पाटेकुर्रा (झुरकुटोला) येथे चक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंती थाटात साजरी...](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63e0da2cedfaf.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - सुधीर शिवणकर
गोंदिया - पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांची जयंती सडक अर्जुनी तालुक्यातील पाटेकुर्रा (झुरकुटोला) येथे वसंत पंचमीच्या पर्वावर थाटात साजरी करण्यात आली. दरम्यान गावात राजाभोज दिंडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने पोवार समाज बांधव व गावातील इतर समाजाचे बांधव सहभागी झाले होते.
पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंती निमित्त समाज बांधवांनी व गावातील नागरिकांनी एकतेचा परिचय दिला. तत्पूर्वी गावात समाज बांधवांनी राजाभोज दिंडीच्या मिरवणुकीचे आयोजन केले होते. राजाभोज दिंडीच्या मिरवणुकीनंतर कार्यक्रमस्थळी पाहुण्यांचे आगमन होऊन चक्रवर्ती सम्राट राजा भोज व माॅ. गडकालिका मातेचे पुजन, दिपप्रज्वलन करून माॅ. गडकालिका मातेची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच सायंकाळी पोवारी संगीत कार्यक्रम ऑर्केस्ट्रा जे.के. म्युझिकल ग्रुप गोंदिया पोवारी गायक रोशन राहांगडाले व सोहन पटले यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार खुशाल बोपचे यांनी सांगितले की, भारतात १८ ग्रंथाचे निर्माण करणारे राजा भोज हे राजा होते. राजाभोज उत्तम साहित्यिक,आध्यात्मिक व अभ्यासक होते. आता समय परिवर्तन झाले असून, आपल्या समाजाने परिवर्तनशील झाले पाहिजे तरच; समाज संघटित होईल. चक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंती कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. खुशाल कटरे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र महासंघ, अध्यक्ष माजी खासदार खुशाल बोपचे, दिप प्रज्वलन डॉ.भुमेश्वर पटले जि.प.सदस्य, लीलाभाऊ राहांगडाले, केतन तुरकर तसेच विशेष अतिथी पायलताई गौतम, विश्वनाथ राहांगडाले, हिरदीलालभाऊ ठाकरे, प्रशांत बालसनवार सरपंच पाटेकुर्रा, विश्वनाथ टेकाम उपसरपंच, पुरणलाल राहांगडाले, रामलाल कटरे भवानी माता ट्रस्ट नागपूर, आर.जे.बिसेन, के.बी.चौधरी, ललीताताई कवरे पोलिस पाटील तसेच अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते. पोवार चक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंती समारोहाचे आयोजन क्षत्रिय पोवार समाज संघटना पाटेकुर्रा (झुरकुटोला) यांनी केले होते. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ.गुणीलाल राहांगडाले, उपाध्यक्ष नरेश कटरे, सचिव डॉ.मुकुंदराव पारधी, योगराज कटरे, लिखीराम राहांगडाले, डॉ.महेन्द्र येळे, धनपाल पारधी, ओमप्रकाश राहांगडाले, डिलेश कटरे, आनंदराव चौधरी, रेवालाल पारधी आदींनी परिश्रम घेतले.