वरवंडी ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली रस्त्याच्या कामासाठी झिरवळांची भेट...
![वरवंडी ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली रस्त्याच्या कामासाठी झिरवळांची भेट...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65bf9ac5513f5.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
वरवंडी ते नाशिक-कळवण व सुरत या मुख्य महामार्गाला जोडणारा नऊ मीटर रुंद रस्त्याचे काम करण्यासाठी वरवंडी येथील ग्रामपंचायतचे सदस्य मधुकर केंग, रामचंद्र केंग, समाधान केंग यांच्या माध्यमातून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना साकडे घालण्यात आले.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावून देऊ असे आश्वासन दिले. यावेळी गावातील ज्येष्ठ सदस्य निवृत्ती केंग यांच्या उपस्थितीत मधुकर केंग यांनी सांगितले की, या रस्त्याचे जर काम लवकरात लवकर झाले तर येथील व परिसरातील शेतकऱ्यांना ग्रामस्थांना आपला शेतातील भाजीपाला बाजार पर्यंत घेऊन जाण्यासाठी सोयीचे होईल तरी या महत्त्वाच्या रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे; या सर्व चर्चेतून नामदार झिरवाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व या रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन दिले.