राजकीय : ज्या संस्थेने कर्ज नाकारलं त्याचं संस्थेच्या चेअरमनपदी निवड, अतिशय चिकाटीतून पदाला गवसणी..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष

ढगे पाटील

चाकण : खेड तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या संपन्न असणाऱ्या खराबवाडी गावातील अनंत कृपा पतसंस्थेच्या चेअरमनपदी युवा नेते सचिन सोपान कड यांची बिनविरोध निवड संपन्न झाली आहे.

सचिन कड यांचा इथपर्यंत प्रवास सोप्पा नाही, आपल्या छोट्याशा व्यवसायातून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून ज्या संस्थेने स्वतःच्या व्यवसायासाठी कर्ज नाकारले त्याचं संस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याने सचिन कड यांच्या आयुष्यातील हा स्वर्ण क्षण असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. सचिन कड हे अतिशय शांत, सय्यमी आणि मितभाषी असल्याने त्यांच्या निवडीच्या निमित्ताने सर्वांनी प्रामाणिक व्यक्तीला न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली. सचिन कड यांची चेअरमन पदावर निवड झाल्याने त्यांच्या दृष्टीने ही भविष्यातील खराबवाडी गावच्या राजकीय प्रवासाची नांदी असल्याचे बोलले जात आहे. सचिन कड यांचा स्वभाव आणि सर्वांशी असलेला स्नेह बघता त्यांना गाव पातळीवर मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे. सचिन कड यांची चेअरमनपदाची खुर्ची ही काटेरी मुकुट आणि संस्थेच्या दृष्टीने कठोर निर्णय घेणारी अशीच असणार आहे. संस्थेचा सुधारलेला आर्थिक पोत अबाधित ठेवणे, संस्थेला मंदिरावरून एका स्वतंत्र जागेत हलवून सुसंज्ज इमारत उभी करणे, कर्जाचा टक्का वाढवून त्याची नियोजन बद्ध वसुली करणे आदी. बाबीवर आता चेअरमन म्हणून सचिन कड यांना काम करावे लागणार आहे.

या चेअरमन पदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती बगाटे यांनी काम पाहिले. तर या निवडीवेळी संस्थेचे माजी चेअरमन सतिश खराबी, व्हा. चेअरमन कल्पना खराबी, संचालक भरत बिरदवडे, माणिक खराबी, शंकर खराबी, शशिकांत कड, कविता कड, शाखा व्यवस्थापक संतोष वाळुंज, गावातील ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक मोठ्या संस्थेने उपस्थिती होते.