बेळसांगवी गावात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या...
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावात अतिवृष्टीने हजारो एकर शेती पाण्याखाली आली होती गावाला पुराने वेडा दिला होता प्रशासनाने पूर्ण गावातील लोकांना वाढवणा येथे स्थलांतरित करण्यात आले होते.शेतीचे नुकसान झाल्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा हतबल होऊन जिवन संपवले आहे.
आतिवृष्टी मुळे भरपूर पाऊस झाला शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातबल झालेल्या मारुती संग्राम रायकवाडे या 28 वर्षाच्या तरुणांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. शेतीतून मिळणारे उत्पन्न पाण्यात गेल्यामुळे आता उदरनिर्वाह करायचा. इतर खर्च कसा भागवायचा या विचाराने त्रस्त होऊन या प्रश्नाची उकल न झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन या तरुणाने टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवले आहे. संपूर्ण गावासह बेळसांगवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.