अबब..!चाकणात किती हे अपघात अन चाकणतील किती त्या महिला मिसिंग, बघा अचंबित करणारी आकडेवारी...!

अबब..!चाकणात किती हे अपघात अन चाकणतील किती त्या महिला मिसिंग, बघा अचंबित करणारी आकडेवारी...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : औद्योगिक दृष्ट्या जगात ज्या शहराचे नाव घेतले जाते त्या चाकण शहराची ओळख फक्त औद्योगिक शहर म्हणूनच नाही तर, त्या शहराला मृतांचे शहर म्हंटले तरी आश्चर्य वाटायला नको.

चाकण शहराची व संपूर्ण चाकण औद्योगिक वसाहतीतील गावांतील  भयानक वास्तव मिळालेल्या माहितीच्या आधारे समोर आले आहे. यातील पहिला मुद्दा चाकण औद्योगिक वसाहतीतील फक्त महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरातून २०२३ वर्ष सुरु झाल्यापासून ते आजच्या तारखीपर्यंत तब्बल ३६ महिला -पुरुष बेपत्ता असल्याच्या संदर्भात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात २० महिलांचा तर, १६ पुरुषांचा समावेश आहे. यावरून बेपत्ता असणाऱ्यामध्ये महिलांचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आले आहे. हिच बाब चाकण व परिसरातील गावासाठी चिंतेची बाब म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही. पोलिसांच्या समय सूचकतेमुळे आत्तापर्यंत मागील ३ महिन्यातील ३६ पैकी १२ महिला व पुरुष यांचा शोध लावण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. त्यात ७ महिला व ५ पुरुषांचा समावेश आहे.

वरील सर्व आकडेवारी बघता चाकण परिसर किती सुसंकृत राहिला यावर न बोललेलेच बरे राहिला. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाल्यामुळे बाहेरील जिल्हातून व बाहेरील राज्यातून अनेक कुटुंबे, तरुण-तरुणी उदरनिर्वाहासाठी चाकणची वाट धरू लागले. यामुळे मोठ्या प्रमाणात चाकण परिसरात वर्दळ वाढली. स्थानिक नागरिकांनी उपजीविकेसाठी बाहेरून आलेल्या कुटूंबांची व तरुण- तरुणीच्या राहण्याची सोय व्हावी यासाठी रूम पद्धतीने इमारती उभ्या केल्या. यातून कोण कुणाचे नातेवाईक, कोण कुणाचे पती-पत्नी याचा मेळ बसणे अवघड झाले आणि पुढे जाऊन यातून अशा घटना घडण्यास सुरुवात झाली.

यावर स्थानिक नागरिकांनी आपण उभ्या केलेल्या इमारतीत कोण राहते या संदर्भातील इतमबुत माहिती ठेवणे क्रमप्राप्त आहे. एवढेच नाही तर त्यांचे कागदपत्रे प्रति घेऊन त्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला कळवणे महत्वाचे आहे. असे केले तर अशा घटना घडण्यापासून टाळता येतील.

या नंतरचा राजकीय नाकर्ते पणामुळे उपस्थित होणारा मुद्दा म्हणजे चाकण-तळेगाव व चाकण-शिक्रापूर रस्त्यावर होणारे भीषण अपघात. या अपघातांची आकडेवारी तर, डोळे दिपून टाकणारी अशीच आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावरती मागील २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ५०२ अपघात झाले आहेत. ही आकडेवारी म्हणजे चाकणकरांसाठी धक्कादेणारी अशीच आहे. या अपघातात एकूण ४६.२% टक्के व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या अपघातात एकूण ४६.६% टक्के व्यक्तींना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अन उर्वरित ७.२ टक्के व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासूनची फक्त महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकडेवारी बघता जानेवारी ते मार्च या महिन्यात एकूण १८ व्यक्तींना आपला जीव अपघातात गमवावा लागला आहे. तर, १२ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

वरील सर्व अपघातांचा व बेपत्ता व्यक्तीचा विचार करता. कुठे तरी चाकणची बिघडलेली सामाजिक संस्कृती व राजकीय नाकर्तेपणा समाज्यापुढे आल्याचे दिसत आहे. राजकारणामुळे किती गोरगरीब जनतेच्या घरातील भाऊ, पती, मुलगा, वडील हे जग सोडून गेल्याचे आपण बघत आलोय. पण याचे कोणतेही सोईर सुतक स्थानिक राजकीय व रस्ते विभागाला नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. यावरून कितीही गरिबांचे मृत्यू झाले तर आम्हाला फक्त राजकारणाचे पडले आहे अशीच काहीशी परिस्थिती खेड तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील व चाकण औद्योगिक वसाहतीतील राजकीय नेत्यांनी डोळे दिपवणारी आकडेवारी बघून डोळे उघडून एकदा तरी त्यावर उपाय योजना करण्यासाठी एकत्र यायला हवे एवढेच...

त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या मुलींचे शिक्षण घेऊन पंखात भरारी घेण्याचे वय असते अशा वयात मुली डोळ्यावर शारीरिक आकर्षणाची पट्टी बांधून एखाद्या व्यक्तीबरोबर निघून जाण्याची वाट धरत आहेत. हे भविष्यातील सामाजिक जडण घडणीसाठी नक्कीच धोकादायक आहे. यात मुलीच नाही तर, ज्या महिलांना दोन दोन मुलं होऊनही त्यांना नक्की कशाच्या आमिषाची हाव भरते त्याही कुणाचाही हात धरून पोबारा करण्यास मागे राहिल्या नाहीत. त्यामुळे एका महिलेची चूक दोन कुटूंबाचे आयुष्य उध्वस्त करत असल्याच्या अनेक घटना चाकण परिसरात घडताना पहावयास मिळत आहे. यात ना कोणते सामाजिक बंधने पाळली जातात, ना कुणा थोरा मोठ्याची भीड मर्यादा पाळली जाते. फक्त कोणत्या तरी फायद्यातुन व आकर्षणातून अशा घटना घडत असल्याचे दिसून आले आहे.

या सर्व घटनांचा विचार करता कुठे तरी समाजात जागरूक्ता होणे महत्वाचे आहे. या घटना कमी करण्यासाठी समाज घटकांनी स्वतःहून कुटूंबाला वेळ देऊन योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. राहिला विषय अपघातांचा याला सर्वस्वी तालुक्यातील राजकीय परिस्थिती आणि त्यांच्या हो ला, हो करणारे प्रशासकीय अधिकारी कारणीभूत असल्याचे दिसून येते. राजकारणात एकमेकांच्यावरती कुरघोडी करण्यातच राजकीय लोक विकासाकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. त्यामुळे खेड तालुक्यातील राजकीय नेत्यांना किती गरीब निपराधी व्यक्तीचे जीव जाताय याचे देणे घेणे नसल्याचे दिसते आहे. अजून अशा किती गरीब व्यक्तीचे जीव जाऊन किती कुटुंबे उध्वस्त होणार हेच राजकीय लोक बघत राहणार की यावर काही ठोस उपाययोजना करणार? हेच पहावें लागेल.