BIG BREAKING : अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री आमदार बाबा सिद्धिकी यांची गोळ्या झाडून हत्या..!

BIG BREAKING : अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री आमदार बाबा सिद्धिकी यांची गोळ्या झाडून हत्या..!

News15 मराठी विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजित पवार गट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबाराच्या घटनेमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या कार्यालयाच्या समोर तीन ते चार राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली त्यात ते गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर सिद्धिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णालयात सर्व पक्षीय नेते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यात भाजपा नेते आमदार आशिष शेलार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता संजय दत्त, अजित पवार यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या प्रकरणात २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एक आरोपी हरियाणाचा तर दुसरा आरोपी उत्तरप्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले आहे.   राष्ट्रवादीचे बाबा सिद्धिकी हे ज्येष्ठ नेते आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सिद्धिकी समर्थांकडून इन्साफ दोच्या घोषणा. बाबा सिद्धिकी यांनी नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. १२ फेब्रुवारी २०२४ ला बाबा सिद्धिकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्धिकी हे १९९९, २००४ आणि २००९ साली सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर बाबा सिद्धिकी यांनी राज्यमंत्री पदाची देखील धुरा सांभाळली होती.