फुले महाविद्यालयाच्यावतीने.! हर घर तिरंगा_घर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम

फुले महाविद्यालयाच्यावतीने.! हर घर तिरंगा_घर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि किनगांव येथील महात्मा फुले महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा घर घर तिरंगा मोहिम ९ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट  २०२४ पर्यंत  महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छ आणि सुंदर परिसर करून, त्या उपक्रमांतर्गत १३ ऑगस्ट रोजी महात्मा फुले महाविद्यालयात भारतीय राष्ट्रध्वज श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सदस्या श्रीमती लताताई मोरे यांच्या शुभहस्ते फडकविण्यात येऊन प्राध्यापकवृद्ध आणि विद्यार्थ्यांना भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. बबनराव बोडके यांनी मार्गदर्शन करून परिसरातील दिपक काबळे, सौ ज्योती कांबळे, अनिल भदाडे, उध्दवराव जाधव, इंद्रदेव पवार, बबलु शेख' किशन धरणे, दयाराम हांगे, शिवाजी हुबाड ,  सौ वंदना बैकरे , आखिल शेख , विनायकराव बोडके , यांच्या घरावर तिरंगा लावण्यात आला यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी भारत भदाडे, उपप्राचार्य डॉ विठ्ठल चव्हाण,  प्रा बालाजी आचार्य ,डॉ बळीराम पवार, प्रा पांडूरंग कांबळे , डॉ प्रभाकर स्वामी , डॉ सदाशीव वरवटे, प्रा. संजय जगताप ,घर मालक विनायक बोडके, सौ ज्योती कांबळे ,अनिल भदाडे आदिसह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका विद्यार्थी उपस्थित होते.