जाज्वल्य दैवत हजरत पीर गैबी बाबा यात्रा निमित्त, पोलीस प्रशासनाच्यावतीने आढावा बैठक...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख
लातूर : अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथील जाज्वल्य दैवत हजरत पीर गैबी बाबा यात्रा निमित्त ग्रांम पंचायत कार्यालयात पोलीस स्टेशनच्या वतीने दि.१३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. हि बैठक सहयक पोलीस निरिक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या अध्यक्ष्तेखाली घेण्यात आली तर या वेळी ग्रांमपंचायतचे सरपंच सुमित्राबाई एकनाथराव वाहुळे, उपसरपंच विठ्ठलराव बोडके, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सुनिल वाहुळे, उरूस कमिटीचे अध्यक्ष सलीम जलालसाब बागवाण, उपाध्यक्ष शुभम सुभाष मुंडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रांमपंचायत कर्मचारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झालेले किनगाव पोलीस स्टेशनचे चंदू गोखरे आणि मुरुडकर यांचा ग्राम पंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
