आ. चंद्रीकापूरे यांची मृतक लंजे दाम्पत्यांच्या कुटुंबाला सात्वना भेट...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया
स्थानिक आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी घाटबोरी/को गावात पोहोचून जिवीत वाहिनीच्या स्पर्शाने मृत्युमुखी पडलेल्या लंजे दाम्पत्य यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन, त्यांचे सांत्वन केले. २० सप्टेंबर रोजी निंदण करण्यासाठी शेतात गेलेले तुळशीदास रेवाराम लंजे, माया तुळशीदास लंजे यांना जिवीत वाहिनीच्या स्पर्शाने यांचा मृत्यू झाला होता. तसेच इंदू हिरालाल लंजे या जखमी झालेल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच आमदारांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही दुःखद घटना असल्याचे आमदार म्हणाले. या घटनेचे आम्हाला अतीव दुःख झाले आहे. शासकीय नियमानुसार मृतांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत केली जाईल. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुरे, सरपंच भूमिका बाळबुद्धे, उपकार्यकारी अभियंता नायडू, भुमेश्वर लंजे व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रकरणात अखेर सहाय्यक अभियंता निलंबित.!
तालुक्यातील घाटबोरी/कोहळी येथे विद्युत विभागाचे हलगर्जीपणामुळे शेतकरी पती-पत्नीचा मृत्यु तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विज वितरण कंपनीने सहाय्यक वीज अभियंता कोमल रवींद्र गाडबैल यांना निलंबित केले आहे. या प्रकरणामध्ये विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे नागरिकांच्यावतीने आक्रोश निर्माण झाला होता. आपल्या कर्तव्यात वजबाबदारीत कसूर केल्यामुळे विद्युत प्रवाहाच्या जबर धक्का लागून, सदर दुर्दैवी घटना घडली. विद्युत वाहिनीची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी यात हयगय केल्यामुळे प्राणांकित अपघात झाल्याचा अहवाल वीज वितरण कंपनीला प्राप्त झाला. त्यामुळे विज वितरण कंपनी कर्मचारी सेवा नियम २००५ अनुसूची ११ मधील ग ला अनुसुरुण नियम ४२ नूसार अधीक्षक अभियंता म.रा.विद्युत वीज वितरण कंपनी मर्यादित गोंदिया यांनी; दि.२१ सप्टेंबर रोजी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता कोमल रवींद्र गाडबैल यांना सदर प्रकरणी कारवाई चालू असेपर्यंत व त्याचा अंतिम आदेश मिळेपर्यंत कंपनीच्या सेवेत निलंबित केल्याचे आदेश काढले आहे.