महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल प्रथम गुणांकण देऊन गौरव...!

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल प्रथम गुणांकण देऊन गौरव...!
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल प्रथम गुणांकण देऊन गौरव...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत शस्र बाळगणारे व बाळगून गुन्हे करणारे गुन्हेगारांच्या विरुद्ध १९ जानेवारी २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२३ रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल आयुक्त विनायकुमार चौबे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसापासून समाजात दहशद पसरविण्यासाठी कोयता, तलवार, चाकु, पिस्टल इत्यादीचा वापर करून गुन्हेगार दहशद पसरवत होते. त्यामुळे समाजात निर्माण झालेल्या गुंडाचे दहशदिचे वातावरण निवळण्याकरिता पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी पदभार स्विकारल्या नंतर सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांना विशेष मोहीम राबवून बेकायदा शस्त्रास्त्रे  बाळगणारे व्यक्तीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सदर मोहीम प्रभावी राबविण्याकरिता जे पोलीस ठाणे उल्लेखनीय कामगिरी करून जास्तीत जास्त शस्त्रास्त्रे  पकडतील यासाठी पोलिसांना प्रोत्साहित करण्यासाठी गुणांकन  पद्धत वापरली होती.

सदर शस्त्रास्त्रे  जप्तीच्या विशेष मोहिमेमध्ये महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन मार्गदर्शन केल्यामुळे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ४ पिस्टल व ४ घातक तलवारी, कोयते जप्त करून संबंधितावर कारवाई केली.

या उल्लेखनीय कामगिरीमध्ये गुणांकणात पिंपरी चिंचवड आयुक्तालयात प्रथम क्रमांक आल्याने पोलीस आयुक्त यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर पाटील, गुन्हे शोध पथक पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी व सर्व सहकारी अंमलदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.