पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ कडून वाघजाईनगरला गावठी हातभट्टी दारू पकडली..!

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ कडून वाघजाईनगरला गावठी हातभट्टी दारू पकडली..!

News15 मराठी प्रतिंनिधी विश्वनाथ केसवड 

चाकण: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ कडून ४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२:५० वाजताच्या सुमारास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमी वरून एक इसम पिकअप गाडी मधून बिरदवडी ते वाघाजाईनगर फाटा रोडने गावठी हातभट्टी दारूची अवैध रित्या वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस नाईक भोसुरे यांनी पोलिस शिपाई मेरगळ यांना सोबत घेऊन सदर होत असलेल्या अवैध गावठी दारूच्या वाहतुकीच्या बाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना माहिती दिली. त्यांनी वेळेचा विलंब न करता थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे वाघाजाईनगर फाट्यावर एक पिकअप थांबवून चालकाकडे विचारपूस केली असता हा मोठा अवैध गावठी दारू साठा मिळून आला. ही अवैध दारू महाळुंगे, चाकण परिसरात विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती या कारवाईतून उघड झाली आहे. 

या कारवाईत ३५ लिटर मापाची काळे, पिवळे,निळे, पांढरे रंगाचे एकूण २४ प्लॅस्टिक कॅन त्यामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू एकूण ८४० लिटर प्रत्येकी १०० रुपये प्रती किमतीची एकूण तब्बल ८४००० हजारांची अवैध गावठी दारू साठा जप्त करण्यात आला. त्याच बरोबर ही अवैध दारू वाहतूक करणारा एम एच १४ ई एम ४९७८ नंबरची ६०००० लाख रुपयांची पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. असा एकूण ६ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट-३ कडून जमा करण्यात आला आहे. 

या प्रकरणात आरोपी पिकअप टेम्पो चालक द्याराम नाथाराम चौधरी(वय-४० वर्षे) रा. संजयगांधीनगर, मोशी, ता. हवेली, जि.पुणे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई)(क), (ड) नुसार सरकार तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राजकुमार दामोदर हनमंते पोलिस शिपाई गुन्हे शाखा युनिट -३ यांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी करत आहेत.