राहुरी कृषी विद्यापीठ वादग्रस्त कुलसचिव सोपान कासार यांच्याकडून तक्रारदार बाळासाहेब जाधव यांना अज्ञात व्यक्ती पाठवून दिली जीवे मारण्याची धमकी..

News15 विशेष प्रतिनिधी राहुरी : राहुरी कृषी विद्यापीठाचे वादग्रस्त कुलसचिव सोपान कासार यांच्या वरती काही दिवसांपूर्वी राहुरी येथील 4 कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी अट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला हॊता. यानंतर कुलसचिव सोपान कासार यांचा जामीन अर्जही अहमदनगर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला होता. यानंतर सोपान कासार हे फरार झाले होते. काही दिवसांपूर्वी मुंबई खंडपीठाच्या औरंगाबाद उच्च न्यायालयाने त्यांना पुढील तारीख मिळेपर्यंत तात्पुरते अटक करू नये असे राहुरी पोलीस यांना आदेश दिले होते. यामुळे सोपान कासार रासरोज पणे कृषी विद्यापीठात वावरत आहेत. त्यांचा शासनाकडून कोणत्याही प्रकारचा कार्यकाळ वाढवलेला नसताना ते सर्व विद्यापीठाचा कारभार हाताळत असल्याचे समोर आले आहे. याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यातच रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती कोरी नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून येऊन सोपान कासार यांच्या विरोधात तक्रार दाखल करणारे 4 कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनाच सोपान कासार यांच्या वरील अट्रोसिटीची तक्रार मागे घे आणि औरंगाबाद कोर्टात तू वकील देऊ नको नाहीतर तुला गोळ्या घालून जीवे मारू अशी धमकी दिली. यामुळे तक्रारदार यांचे संपूर्ण कुटुंब दहशदी खाली वावरत आहे. सोपान कासार यांची भाडोत्री गुंड पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यापर्येंत मजल गेल्याने त्यांच्या पासून मला व माझ्या कुटूंबाच्या जीवितास धोका आहे. मी रात्री घडलेल्या प्रकारा बद्दल राहुरी पोलीस स्टेशनला भा.द.वि ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. माझ्या व कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी राहुरी कृषी विद्यापीठ कुलसचिव सोपान कासार जबाबदार असतील असे 4 कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी बोलताना सांगितले. तरी या गंभीर घडलेल्या घटनेनंतर राज्य सरकार नक्की या कुलसचिव कासार यावरती कारवाई करणार की कुणाचा जीव जाण्याची वाट बघणार हेच आता पहावे लागेल..