झोपेच्या गोळ्या देऊन आई-वडीलासह भावाची हत्या.! आरोपी मुलाला अटक...

झोपेच्या गोळ्या देऊन आई-वडीलासह भावाची हत्या.! आरोपी मुलाला अटक...

NEWS15 मराठी प्रतिनिधी -  नारायण काळे

हिंगोली : झोपेच्या गोळ्या देऊन आपल्या जन्मदात्या आई-वडीलांसह भावाची हत्या करणाऱ्या आरोपी मुलास, स्थानिक गुन्हे शाखा आणि बासबा पोलिसांची संयुक्त कारवाई करत अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी शेत शिवारात अपघात होऊन एकाच कुटुंबातील तीनजन; कुंडलिक जाधव (वय 70), कलावती कुंडलिक जाधव (वय 60) आणि आकाश कुंडलिक जाधव (वय 27) वर्ष या तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. 11 जानेवारी रोजी घडली होती. घटनेची माहिती मिळताच बांसबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास चवसी यांनी भेट देत घटनेची माहिती मयत नातेवाईकांना दिली.

यावेळी मयतांचा मुलगा महेन्द्र जाधव याने पोलीसांनी सांगितले की माझे वडील याची प्रकृती बिघडल्याने माझा भाऊ आकाश जाधव, वडील,आई हे उपचारासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाला असावा अशी माहिती दिली. परंतु पोलीसांना संशय आल्याने, पोलिसांनी तपासचक्रे फिरवून हा अपघात नसून मयताचा मुलगा महेन्द्र जाधव याने आई-वडील व भाऊचा खुन केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. ही हत्या अनैतिक संबंधाला विरोध केला प्रकरणी तसेच पैसे देत नसल्याच्या कारणावरून व वारंवार होत असलेल्या वाद/रागामुळे स्वःताच्या मुलाने आईवडीला्सह भावाला झोपेच्या गोळ्या दिल्या त्यांनंतर एका एकाचा खुन करुन तिघांना शेतशिवारातील रस्त्याच्या खड्ड्यात दुचाकीसह फेकले. अपघाताचा बनाव रचत कट रचून तिघांचा खुन केला. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि बासंबा पोलिसांनी तपास करुन आरोपीस बेड्या ठोकल्या आहे.